युवा उद्योजक प्रीतम विलास गावडे यांनी तालुकाध्यक्ष पदाबरोबरच मनसेच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा

मालवण, दि.३ मार्च
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील महाराष्ट्र नवनिर्माण सेना पक्षात उलथापालथी सुरु असतानाच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने अलीकडेच मालवण तालुकाध्यक्ष म्हणून नियुक्त केलेल्या युवा उद्योजक प्रीतम विलास गावडे यांनी तालुकाध्यक्ष पदाबरोबरच मनसेच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. प्रीतम गावडे यांच्या कार्यकर्त्यांनी देखील पक्षाला सोडचिठ्ठी दिली आहे. या राजीनाम्यामुळे मनसेला मोठा धक्का बसल्याचे बोलले जात आहे

दरम्यान, प्रीतम गावडे हे आज संध्याकाळीच रत्नागिरी येथे शिवसेना नेते किरण सामंत यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश करून आपल्या नवीन राजकीय वाटचालीचा श्रीगणेशा करणार आहेत

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला अलीकडे सिंधुदुर्गात मोठी गळती लागली आहे. जिल्हा मनसेची नवीन कार्यकारणी जाहीर झाल्यानंतर माजी आमदार परशुराम उपरकर यांच्या समर्थकांनी राजीनामे दिल्यानंतर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या आदेशानुसार पक्षाने उपरकरांवर कारवाई केली. यानंतर मनसे मधील राजीनाम्याचे सत्र मोठ्या प्रमाणात वाढले होते. मात्र प्रीतम गावडे यांनी आपल्या मनसे पदाचा राजीनामा दिला नव्हता एक हरहुन्नरी युवक म्हणून काम करताना प्रीतम गावडे यांनी अलीकडच्या काळात मनसे व्दारे अनेक उपक्रम राबविले होते आज अचानक श्री गावडे यांनी मनसे तालुकाध्यक्ष पदाचा व प्राथमिक सदस्यत्वचा राजीनामा दिला आज संध्याकाळी 60 ते 70 युवा कार्यकर्त्यांसमवेत शिवसेना पक्षात गावडे हे प्रवेश करणार आहेत

दरम्यान, मनसेने अलीकडेच केलेल्या नवीन नियुक्त्यांमध्ये चौके येथील युवा उद्योजक प्रीतम गावडे यांची मालवण तालुकाध्यक्षपदी नियुक्ती केली होती. मात्र प्रीतम गावडे यांनी कार्यकर्त्यांसह आपल्या तालुकाध्यक्ष पदासह पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिल्याने खळबळ उडाली आहे.