सावंतवाडी दि.३ मार्च
सावंतवाडी तालुका विधी सेवा समिती व वकिल संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने घेणेत आलेल्या राष्ट्रीय लोकअदालतमध्ये वादपुर्व व न्यायालयीन प्रलंबित अशी एकूण ११६५ प्रकरणे ठेवण्यात आली होती. त्यापैकी एकूण २७ प्रकरणे सामजस्याने व तडजोडीने निकाली काढण्यात आली त्यातून रु. ६,१६,२३१/- वसुल करणेत आली.
सावंतवाडी न्यायालयाच्या दिवाणी न्यायाधीश मा. श्रीमती. डी. पी. पुजारी, दिवाणी न्यायाधीश, यांच्या उपस्थितीत हे राष्ट्रीय लोकअदालत झाले. यावेळी पॅनेल समिती सदस्य अॅड. व्ही. एस. राऊळ उपस्थित होते.
सदरहू लोकन्यायात वादपूर्व प्रकरणे ७१२ ठेवणेत आली होती. त्यापैकी १२ प्रकरणे निकाली होवून रु २,४४,३१०/- रक्कम वसूल झाली.न्यायालयीन प्रलंबित प्रकरणे ४५३ ठेवण्यात आली. त्यापैकी १५ प्रकरणे निकाली होवून रु ३,७१,९२१/- रक्कम वसूल झाली.
लोकन्यायालय यशस्वी करणेसाठी न्यायालयाचे सहा. अधिक्षक (आस्था) – कु. ओ. यु. शेख व सहा. अधिक्षक (वित्त) एम. मीर आदी न्यायालयीन कर्मचारी व पोलीस उपस्थित होते.