आंबोली,दि.३ मार्च
येथील अतिक्रमण सर्व्हे क्रमांक 23 बद्दल दिलेल्या खुलाशाबद्दल संतोष राऊत गावठण यांनी दिलगिरी व्यक्त केली असून गावठण,फौजदार वाडी,रमाईनगर येथील ग्रामस्थांच्या आंदोलनाबद्दल आपल्याकडून चुकीचा शब्द गेला आहे,तो आपण मागे घेत असून आपली आंदोलनाबद्दल कोणतीही हरकत अथवा विरोधात्मक भूमिका नाही.ग्रामस्थांच्या आंदोलनाबाबत आपली वेगळी भूमिका नाही.कोणीही चुकीचा समज करून घेत असल्यास आपण त्याबद्दल दिलगिरी व्यक्त करीत आहोत असे पत्रक संतोष रामा राऊत यांनी दिले आहे. बाहेरच्या लोकांच्या अतिक्रमबद्दल आपला ग्रामस्थांना विरोध नाही.आपली त्या ठिकाणी वहिवाट आहे एवढंच आपलं म्हणणं आहे. असा खुलासा संतोष राऊत यांनी पत्रकातून केला आहे.