नगरपरिषदेच्या जिमखाना मैदानावर असलेल्या स्विमिंग पूल चा वापर नसल्याने पाण्यात घाणीचे साम्राज्य
सावंतवाडी दि.३ मार्च
सावंतवाडी नगरपरिषदेच्या जिमखाना मैदानावर असलेल्या स्विमिंग पूल चा वापर नसल्याने पाण्यात घाणीचे साम्राज्य पसरले आहे. सुमारे ८० लाख दुरुस्तीच्या नावाखाली खर्च करूनही ते पाण्यात गेल्याची चर्चा आहे.
सावंतवाडी नगरपरिषदेने जिमखाना मैदानावर स्विमिंग पूल, व्यायाम शाळा आणि खेळासाठी मैदान विकसित केले आहे. मात्र स्विमिंग पूल वापराविना बंद आहे.
नगरपरिषदेने या स्विमिंग पूल देखभालीसाठी नेमलेल्या कंत्राटदार किंवा नगरपरिषदेने दुर्लक्ष केले आहे. त्यामुळे लाखो रुपये खर्च करूनही स्विमिंग पूल वापराविना बंद ठेवण्यात आले आहे.