सावंतवाडीत क्रिकेट स्पर्धा संपन्न.!
सावंतवाडी दि.३ मार्च
आजच्या धकाधकीच्या जीवनात पत्रकार नेहमीच व्यस्त असतात. अशावेळी पत्रकारांनी विविध प्रकारे खेळ खेळून स्वतःचे आरोग्य जपावं, असे प्रतिपादन राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांनी सावंतवाडी येथे व्यक्त केले.
सावंतवाडी तालुका पत्रकार संघ (संलग्न सिंधुदुर्ग जिल्हा पत्रकार संघ) यांच्या वतीने रविवारी जिल्हास्तरीय आचार्य बाळशास्त्री जांभेकर चषक क्रिकेट स्पर्धा – २०२४ सावंतवाडी येथे जिमखाना मैदानावर संपन्न झाल्या.
या स्पर्धेच्या निमित्ताने पत्रकार खेळाडूंना पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांनी उपस्थित राहून शुभेच्छा दिल्या. यावेळी माजी आमदार राजन तेली, आनंद नेवगी, मनोज नाईक यांसह विविध मान्यवर उपस्थित होते.
प्रारंभी पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांचे सावंतवाडी तालुकाध्यक्ष हरिश्चंद्र पवार यांनी स्वागत केले. यावेळी
यावेळी सिंधुदुर्ग जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष उमेश तोरसकर, सावंतवाडी तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष हरिश्चंद्र पवार, माजी अध्यक्ष प्रवीण मांजरेकर, ज्येष्ठ पत्रकार अण्णा केसरकर, गजानन नाईक, अभिमन्यू लोंढे, सोशल मीडियाचे जिल्हाध्यक्ष अमोल टेंबकर, तालुका पत्रकार संघाचे सचिव मयूर चराठकर, खजिनदार रामचंद्र कुडाळकर, तालुका पत्रकार संघाचे उपाध्यक्ष दीपक गावकर, माजी अध्यक्ष राजेश मोंडकर, सचिन रेडकर, प्रा. रुपेश पाटील, विजय राऊत, काका भिसे, जय भोसले, हर्षवर्धन धारणकर, संतोष परब, राजेश नाईक, शैलेश मयेकर, निखिल माळकर व अन्य पत्रकार बांधव उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. रुपेश पाटील यांनी केले.