सावंतवाडी दि.३ मार्च
कोलगांवचे माजी सरपंच, विविध कार्यकारी सोसायटी कोलगांव संचालक, व सावंतवाडी खरेदी संघ संचालक प्रभाकर उर्फ भाई राऊळ यांचे निधन झाले. कोलगाव चाफेआळी येथे झाडावरून पडून ते जखमी झाले होते. त्यांच्या डोक्याला तसेच नाकाला जबर मार बसला होता.शरीरातून अंतर्गत रक्तस्त्राव झाला होता. त्याच्यावर उपचार सुरू होते.त्यातच त्याचे निधन झाले.
प्रभाकर राऊळ यांनी कोलगाव सरपंच, तंटामुक्ती अध्यक्ष अशा अनेक पदावर काम केले होते सध्या ते कोलगांव विविध कार्यकारी सोसायटी चे संचालक तसेच सावंतवाडी खरेदी विक्री संघाचे संचालक म्हणून कार्यरत होते. सामाजिक कार्यात ते नेहमी अग्रेसर असायचे त्याच्या जाण्याने कोलगाव गावावर शोककळा पसरली आहे.
पश्चात पत्नी,मुलगे, विवाहित मुली,भाऊ, असा परिवार आहे.
Home आपलं सिंधुदुर्ग माजी सरपंच, विविध कार्यकारी सोसायटी कोलगांव संचालक, व सावंतवाडी खरेदी संघ संचालक...