देवगड, दि.३ मार्च
श्री. स. ह. केळकर महाविद्यालय महिला विकास कक्ष तसेच जिल्हा कौशल्य विकास स्वयंरोजगार आणि उद्योजकता मार्गदर्शन केंद्र सिंधुदुर्ग यांच्या संयुक्त विद्यमाने महाविद्यालयात स्त्री पुरुष समानता बेटी बचाव बेटी पढाव अभियान अंतर्गत कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले .
या कार्यशाळेसाठी . गणेश चिमणकर सहाय्यक कमिशनर जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र सिंधुदुर्ग तसेच श्री गोविंद परब जिल्हा समन्वयक अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळ सिंधुदुर्ग हे दोन मार्गदर्शक लाभले. या कार्यशाळेचा उद्देश प्रास्ताविकामध्ये स्पष्ट केला गेला तसेच पाहुण्यांचा परिचय स्वागत व असे कार्यक्रम आयोजित करण्याचे उद्दिष्ट याबाबत महिला विकास कक्ष समन्वयक डॉ. सुखदा जांभळे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले
कार्यशाळेच्या पहिल्या सत्रात गणेश चिमणकर यांनी विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षा व उद्योजकता यामध्ये करिअर निर्माण करण्यासाठी योग्य ते मार्गदर्शन केले आणि शासनाच्या विविध योजनांमधून विद्यार्थ्यांना होणारी मदत याबाबत मार्गदर्शन केले तसेच योग्य नागरिक घडण्यासाठी विद्यार्थ्यांना प्रेरित केले. गोविंद परब यांनी कार्यशाळेच्या द्वितीय सत्रामध्ये विद्यार्थ्यांना उद्योजकतेसाठी विविध मार्गदर्शनाचा मार्ग, विविध योजनांच्या माध्यमातून होणारे अर्थसहाय्य व स्वयंरोजगार याबाबत प्रेरणादायक मार्गदर्शन केले.
महाराष्ट्र राज्य इनोव्हेशन सोसायटी, कौशल्य विकास, रोजगार, उद्योजकता आणि नवोपक्रम विभाग, महाराष्ट्र सरकार, मुंबई यांच्या वतीने घेण्यात आलेल्या ‘महाराष्ट्र स्टुडंट्स इनोव्हेशन चॅलेंज २०२३’ स्पर्धेचा सिंधुदुर्ग जिल्हास्तरावरील निकाल घोषित करण्यात आला असून यात कुमारी प्राची सुनील कदम हिने यश प्राप्त करून एक लाखाचं बक्षीस मिळवले होते. तिच्या या यशाचेही या कार्यक्रमाच्या निमित्ताने कौतुक करून सत्कार करण्यात आला.
कार्यक्रम व्यवस्थितरित्या पार पडल्याने महाविद्यालयाच्या प्राचार्यांनी उपस्थित मार्गदर्शकांचे आणि महाविद्यालयाच्या प्राध्यापक व विद्यार्थी वर्गाचे कौतुक करून आभार मानले.