नांदगाव येथील जागृत देवस्थान श्री देव कोळंबाचा ५ मे रोजी जत्रोत्सव

0

कणकवली दि.१३ जानेवारी(भगवान लोके)

भक्तांच्या हाकेला धावणारा, नवसाला पावणारा सिंधुदुर्ग जिल्ह्यातील नांदगाव येथील जागृत देवस्थान श्री देव कोळंबा जत्रा रविवार, ०५ मे २०२४ रोजी आयोजित करण्यात आली आहे.

सकाळी ८.०० ते ९.०० वा. पूजाविधी, सकाळी ९.०० ते २.०० वा. नवसफेड करणे, दुपारी १२.०० ते ४.०० वा. नवीन नवस बोलणे, सायं. ४.०० ते ८.०० वा. महाप्रसाद वाटप करण्यात येणार आहे.तरी या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असे आवाहन श्री देव कोळंबा उत्कर्ष सेवा मंडळ, नांदगाव अध्यक्ष नागेश मोरये यांनी केले आहे.