देवगड,दि.३ मार्च
देवगड समुद्रात मासेमारीसाठी गेलेल्या नौकेवरील खलाशाची अचानक प्रकृती बिघडल्याने त्याला उपचारासाठी देवगड ग्रामीण रुग्णालयात दाखल केले मात्र देवगड ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर विटकर यांनी तो मृत असल्याचे जाहीर केले. ही घटना रविवार तीन मार्च रोजी ७:३० च्या सुमारास घडली.या घटनेसंदर्भात संतोष तारी यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार आकस्मिक मृत्यूची नोंद देवगड पोलीस स्थानकात करण्यात आली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, देवगड समुद्रात मच्छीमारी नौका १ मार्च रोजी सायं. ६ वा. मासेमारी करण्यासाठी गेली होती. या नौकेवरील खलाशी पिंटू मधु कुलू वय २३, सध्या राहणार देवगड (मूळ राहणार घरेलूपाडा सुंदरगड ओरिसा) याच्या आज ३ मार्च रोजी पहाटे ३ वाजण्याच्या सुमारास छातीत व पोटात दुखत असल्याने देवगड बंदरात आणत असताना अचानक अस्वस्थ होऊन त्याची हालचाल बंद झाली.त्याला सकाळी ७.३० वा. देवगड ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी आणले असता देवगड ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक यांनी तो मयत झाल्याचे घोषित केले.
अधिक तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल राजन जाधव करीत आहेत.