सावंतवाडी दि.३ मार्च
सिंधुदुर्ग रत्नागिरी लोकसभा मतदारसंघात कमळ फुलवायचे आहे, ही काळ्या दगडावरची रेघ आहे असे असा विश्वास गोवा राज्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी भाजपाच्या सिंधुदुर्ग जिल्हा बुथस्तरीय कार्यकर्त्यांसमोर व्यक्त केला. या ठिकाणी मुख्यमंत्री तुमच्याकडे येतो त्यामुळे या जागेवर कॉम्प्रमाईज होणार नाही. कोकणात भाजपाचे कमळ फुलवायचे आहे असे त्यांनी सांगितले.
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील भाजपा बुथस्तरीय कार्यकर्ता मेळाव्यामध्ये डॉ. प्रमोद सावंत बोलत होते. भारत देशामध्ये जनकल्याण्याची योजना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राबविलेल्या असून मोदी हीच गॅरंटी आहे असे ते म्हणाले.
डॉ प्रमोद सावंत म्हणाले,देशाच्या विकासासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी दहा वर्षे झटले. देशातील विविध प्रश्न सोडविले. जनकल्याण योजना राबविल्या. त्यामुळे जनतेला पंतप्रधान नरेंद्र मोदी वर विश्वास आहे. आज देशात एकच गॅरंटी चालतेय,ती मोदी गॅरंटी चालतेय . मोदी यांनी नारी, युवा, किसान शक्ती आणि गरीब कल्याण योजना राबविल्या मात्र काँग्रेस व राहुल गांधी यांच्यावर जनतेचा विश्वास राहिलेला नाही. त्यांच्याकडे कार्यकर्त्यांला तेथे मान दिला जात नाही त्यामुळे सिंधुदुर्ग रत्नागिरी लोकसभा मतदारसंघात कमळ फुलणार आहे.
भारतीय जनता पार्टी सिंधुदुर्ग चे बुथस्थरीय कार्यकर्ता महासंमेलन आरपीडी हायस्कूलच्या प्रांगणात आयोजित करण्यात आले होते. यावेळी द्धिपप्रज्वलीत करून भाजपचे क्लस्टर प्रमुख,गोवा राज्याचे मुख्यमंत्री डॉ प्रमोद सावंत यांनी उद्घाटन केले. माजी खासदार निलेश राणे,भाजपचे जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत, माजी आमदार प्रमोद जठार,माजी आमदार राजन तेली, बाळ माने, विनायक पाटील,जिल्हा बँक अध्यक्ष मनीष दळवी, जिल्हा बँक उपाध्यक्ष अतुल काळसेकर, महिला जिल्हाध्यक्षा सौ श्वेता क़ोरगावकर, माजी नगराध्यक्ष संजू परब,जिल्हा सरचिटणीस महेश सारंग, भाजपचे युवा मोर्चा उपाध्यक्ष युवराज लखमराजे भोसले,शैलेंद्र दळवी, अशोक सावंत,दादू कविटकर, प्रज्ञा ढवण, प्रसन्न देसाई, मनोज नाईक,संध्या तेजस, बंड्या सावंत, चंद्रकांत जाधव, रणजीत देसाई, दादा साईल,राजेंद्र म्हापसेकर,काका ओगले, अजय गोंदावळे,आनंद नेवगी , परिक्षीत मांजरेकर,आदी उपस्थित होते.
मुख्यमंत्री सावंत म्हणाले, काँग्रेसने चुकीच्या धोरणांची अंमलबजावणी केल्याने देश डबघाईस आला. मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मागील दहा वर्षाच्या काळामध्ये साठ वर्षात काँग्रेस सरकारने काम केले नाही त्याच्या दुपटीने काम केली आहेत साठ वर्षात देशात ७४ विमानतळ विकसित झाली मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या काळात दहा वर्षाच्या काळात १५० विमानतळे विकसित झाली. रेल्वे, नॅशनल हायवे आणि पायाभूत सुविधा बाबत मोदींनी मोठ्या प्रमाणात काम केले. छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याची निर्मिती केली त्यावेळी त्यांच्यासोबत मावळे होते याच पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विश्वकर्मा योजना आणून जनतेला न्याय दिला. या योजनेत मोदींची गॅरंटी चालते.
यावेळी भाजपा जिल्हा अध्यक्ष प्रभाकर सावंत माजी आमदार राजन तेली माजी खासदार निलेश राणे रणजीत देसाई तसेच मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त केले.


