डामरे येथे कौटुंबिक वादातून पती, सासू-सासरे, जाऊ यांच्यावर गुन्हा दाखल

कणकवली दि.३ मार्च(भगवान लोके)
डामरे कानडेवाडी येथील महेश्वरी महेश कानडे यांना मारहाण केल्या प्रकरणी पती, सासू-सासरे, जाऊ यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबतची फिर्याद महेश्वरी कानडे यांनी कणकवली पोलीस ठाण्यात दिली आहे.या कौटुंबिक वादाची घटना शनिवारी सायंकाळी ५.३० वाजण्याच्या सुमारास घडली.

याबाबत सविस्तर वृत्त असे की,फिर्यादी महेश्वरी कानडे यांनी घरातील बेसिंग चे काम करण्यासाठी शेजारी राहणारे किरण वडर यांना बोलावले होते. त्यादरम्यान पती महेश नारायण कानडे, सासरे नारायण मधुकर कानडे (६१), सासू रीना नारायण कानडे(५८), जाऊ श्रद्धा शैलेश कानडे (४२) यांनी किरण याला पाहून माहेश्वरी हिला शिव्या च्या दांड्याने व हाताच्या थापताने मारहाण केली. तसेच शिवीगाळ केली. सासरे नारायण कानडे हे माहेश्वरी कानडे यांच्या अंगावर धावून जात असताना किरण वडर व माहेश्वरी कानडे तिच्या आई-वडिलांनी त्यांना अडवले, असे फिर्यादीत म्हटले आहे. अधिक तपास कणकवली पोलीस करत आहेत.