गोव्याचे मुख्यमंत्री ना डॉ श्री प्रमोद सावंत यांची सावंतवाड़ी मेडिकल असोसिएशनला सदिच्छा भेट!!!

सावंतवाडी दि.४ मार्च 
गोवा राज्याचे मुख्यमंत्री मा ना डॉ श्री प्रमोद सावंत यानी सावंतवाड़ी तील यशराज हॉस्पिटल येथे सावंतवाड़ी मेडिकल असोसिएशन च्या सर्व पदाधिकारी आणि सदस्य यांचि सदिच्छा भेट घेतली.

या प्रसंगी मेडिकल असोसिएशन चे अध्यक्ष डॉ राजेश नवांगुळ यानी सावंतवाड़ी मेडिकल असोसिएशन च्या विविध समाजोपयोगी उपक्रमांची माहिती ना डॉ प्रमोद सावंत याना दिली.तसेच मेडिकल असोसिएशन चे डॉ मिलिंद खानोलकर यानी गोवा शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालय यांच्या नवजात बालकांच्या अतिदक्षता सेवा सोबतच म्हापसा येथिल अँजेलो रुग्णालयाच्या अतिदक्षता विभागाच्या सेवा सिंधुदुर्ग जिल्ह्यातील नवजात रुग्णाना उपलब्ध कराव्या अशी विनंती केली.
श्री डॉ प्रमोद सावंत यानी या प्रश्नी लक्ष घालू असे आश्वासन दिले .तसेच धारगळ येथिल आयुर्विज्ञान संस्थान गोवा येथील रुग्णालयात मेडिकल असोसिएशन चा सहभाग वाढवून विशेष आधुनिक सेवा सामंज्यस्य करारा द्वारे सर्व सामान्य नागरीकास उपलब्ध केल्यास अधिक रुग्णाना याचा फायदा होइल असे प्रतिपादन केले.या प्रसंगी सावंतवाड़ी येथिल सर्व प्रथितयश डॉक्टर उपस्थित होते.