देवगड,दि.४ मार्च
घाडीगावकर समाजाचा मोफत वधू वर मेळावा : क्ष. मराठा घाडीगावकर सेवा समाज, महाराष्ट्र राज्य, मुंबई या संस्थेच्या माध्यमातून संस्थेच्या “मध्य मुंबई विभागा” तर्फे घाडीगावकर समाजातील ” वधू आणि वर, तसेच पालक यांचा परिचय मेळावा ” रविवार दिनांक १७ मार्च २०२४ रोजी सायंकाळी ४ वाजता मुंबई मराठी ग्रंथ संग्रहालय, दादर, मुंबई येथे आयोजित करण्यात आलेला आहे. सदर मेळावा समाजातील बांधवांसाठी उपयुक्त असून, हा मेळावा राज्यस्तरीय पातळीवर आयोजित करण्यात आलेला आहे. तरी समाजातील विवाह इच्छुक वधू-वरांनी सदर मेळाव्यात प्रत्यक्ष उपस्थित राहून आपल्या योग्य वधू-वरची निवड करावयाची आहे. त्यामुळे त्यांनी उपस्थित राहणं फार गरजेचे आहे. सदर मेळाव्यासाठी सिंधुदुर्ग, पुणे व नाशिक जिल्ह्यातूनही काही वधुवर उपस्थितीत राहण्याची शक्यता आहे. तसेच सदर मेळाव्यामध्ये समाजातील उच्चशिक्षित वधू-वर सुद्धा उपस्थित राहणार आहेत याची सर्व समाज बांधवांनी नोंद घेऊन, आपल्या परिचित असलेल्या सर्व समाज बांधवांना याची माहिती देऊन त्यांना सुद्धा सदर मेळाव्यात उपस्थित राहण्याची विनंती करावी. या मेळाव्यांबाबत ज्यांनी समाजाकडे नावे नोंदवलेली आहेत. त्यांनी पुन्हा नाव नोंदविण्याची आवश्यकता नसून, फक्त नवीन येणाऱ्यानेच नाव नोंदविण्याचे आवश्यक आहे. त्याप्रमाणे नावाची नोंदणी सध्या समाजाच्या मुख्य कार्यालयात सुरू झालेली आहे. याबाबत सविस्तर माहितीसाठी संस्थेचे मध्यवर्ती समितीचे कार्यकारणी सदस्य रघुवीर वायंगणकर यांना 8830666579 या नंबर वर संपर्क साधून सहकार्य करावे. अशी समाजाच्या वतीने विनंती करण्यात आलेली आहे.