मसुरे,दि.४ मार्च(झुंजार पेडणेकर)
आई भराडी यात्रे निमित्ताने आंगणेवाडी येथे श्री देवी भगवती दशावतार नाट्य मंडळ देवगड मुणगे डोंबिवलीचे संचालक प्रकाश पांडूरंग लब्दे यांचा आंगणे कुटुंबीय आंगणेवाडी यांच्या वतीने
सन्मान करण्यात आला. आंगणे कुटुंबीयांनचे भगवती दशावतार नाट्य मंडळाच्या वतीने प्रकाश लब्दे यांनी आभार मानले. त्या वेळी छोटु आंगणे, बाबु आंगणे, पंकज आंगणे आणि आंगणे वाडीतील ग्रामस्थ उपस्थित होते.