कीर्तनकार ह.भ.प.विश्वनाथ महाराज गवंडळकर यांना विश्वकर्मा गुणवंत कामगार पुरस्कार

कणकवली दि.४ मार्च(भगवान लोके)

सिंधुदुर्ग जिल्हा वारकरी संप्रदायाचे जिल्हा अध्यक्ष कीर्तनकार ह.भ.प.विश्वनाथ महाराज गवंडळकर यांना महाराष्ट्र शासन चा विश्वकर्मा गुणवंत कामगार पुरस्कार सन 2021-22 हा पुरस्कार मिळाल्या मुळे सिंधुदुर्ग जिल्हा अधिकारी यांनी त्यांची विशेष कार्यकारी अधिकारी म्हणून नेमणूक केलेली आहे. त्याबद्दल त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.ते सध्या कणकवली खरेदी विक्री संघ येथे कार्यरत आहेत.