लिंगडाळ गावात ट्रक व दुचाकी यांमध्ये भीषण अपघात…

दुचाकी वरील दोन जण गंभीर एक किरकोळ जखमी…

देवगड,दि.४ मार्च

तालुक्यातील लिंगडाळ गाव येथे ट्रक व दुचाकी मध्ये झालेल्या अपघातामध्ये दोन जण गंभीर असून एक व्यक्ती किरकोळ जखमी आहे.सदरचा अपघात सकाळी 10:30 वाजण्याच्या सुमारास घडला.

मिळालेल्या माहितीनुसार दुचाकी स्वार ट्रिपल सीट आपल्या कामाच्या ठिकाणी जात असताना ट्रक व दुचकी यामध्ये झालेल्या अपघातामध्ये दुचाकी वरील तीन जणांपैकी दोन जण गंभीर असून एकाच्या खांद्याला किरकोळ दुखापत झाली आहे.गंभीर रुग्णांना अधिक उपचारासाठी पुढे हलवण्यात आले आहे.घटनेची माहिती मिळताच देवगड पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक विजय केसरकर, वाहतूक पोलीस विशाल वैजल, फकृद्दीन आगा तसेच स्थानिक ग्रामस्थांनी अधिक उपचारासाठी अपघातग्रस्तांना पुढे हलवण्यास सहकार्य केले आहे.मात्र अपघाताचे कारण अद्यापही समजू शकले नाही अधिक तपास देवगड पोलीस ठाण्यातील अधिकारी कर्मचारी करत आहेत.