लोकअदालतीमध्ये ३२ प्रकरणे तडजोडीने मिटविली

वेंगुर्ला, दि.४ मार्च

वेंगुर्ला दिवाणी न्यायालयात ३ मार्च रोजी आयोजित केलेल्या राष्ट्रीय लोक अदालतीमध्ये दिवाणीकडील ४, फौजदारीकडील १२, ग्रामपंचायत पाणीपट्टी, घरपट्टी, विविध बँका व विद्युत विभागाकडील १६ अशी एकूण ३२ प्रकरणे तडजोडीने मिटवून २ लाख ७ हजार ३०० एवढी रक्कम वसुल करण्यात आली.

तालुका विधी सेवा समिती वेंगुर्ला व तालुका बार संघटना वेंगुर्ला यांच्या संयुक्त विद्यमाने घेण्यात आलेल्या या राष्ट्रीय लोक अदालतीचे उद्घाटन दिवाणी न्यायाधीश के.के.पाटील व सह दिवाणी न्यायाधीश डी.वाय.रायरीकर यांच्या हस्ते झाले. पॅनेल सदस्य म्हणून अॅड.एस.जी.ठाकूर यांनी काम पाहिले. तर लोकअदालतीसाठी न्यायालयाचे सहाय्यक अधिक्षक एस.एस.कांबळे, एस.एच.खेडेकर, वकील वर्ग, पक्षकार व न्यायालयीन कर्मचारी यांनी सहकार्य केले.