वेंगुर्ला , दि.४ मार्च
वेंगुर्ला येथील श्री रामेश्वर मंदिरात ५ ते ८ मार्च या कालावधीत महाशिवरात्री उत्सव साजरा होणार असून यानिमित्त भजन, दशावतारी नाटक असे कार्यक्रम आयोजित केले आहे.
दि. ५ मार्च रोजी सकाळी उत्सव मूर्तीचे पूजन, रात्रौ ७.३० वा. दत्त प्रासादिक भजन मंडळ कुबलवाडा यांचे भजन, दि. ६ मार्च रोजी सायं.६.३० वा. रामेश्वर दशावतार नाट्य मंडळ, वेंगुर्ला यांचा ‘यमघात‘ हा नाट्यप्रयोग, दि.८ मार्च रोजी धार्मिक विधी, रात्री सातेरी मंदिरातून तरंग देवतांचे आगमनानंतर तरंग देवतांसह श्री रामेश्वराची पालखी व लालखी प्रदक्षिणा, त्यानंतर तरंग देवतांकडून रथावर नारळ वाढवून रथ प्रदक्षिणेस सुरुवात होईल. रथ प्रदक्षिणेनंतर नाईक मोचेमाडकर दशावतार नाट्य मंडळाचा नाट्यप्रयोग होणार आहे. श्रींच्या दर्शनाचा लाभ घ्यावा असे आवाहन रामेश्वर देवस्थान ट्रस्टतर्फे केले आहे.