पांडवकालीन सपतनाथ मंदिर ५ मार्च च्या सुर्यास्तानंतर एका रात्रीत मंदिर उभारण्याच्या संकल्प

बांदा दि.४ मार्च 
सरमळे येथे अपूर्णाअवस्थेत असलेले
पांडवकालीन सपतनाथ मंदिर एका रात्रीत उभारण्याचा निर्णय ग्रामस्थांकडून घेण्यात आला आहे. उद्या मंगळवार दि.५ मार्च च्या सुर्यास्तानंतर एका रात्रीत हे मंदिर उभारण्याच्या संकल्प करण्यात आला आहे.
सूर्यास्त झाल्यानंतर हे मंदिर बांधण्यास सुरुवात करण्यात येणार आहे. सुर्यास्त ते सुर्योदय या मधल्या रात्री मंदिर उभारले जाणार आहे.या पार्श्वभूमीवर मंदिरात विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. याबाबतची माहिती ग्रामस्थाच्या माध्यमातून देण्यात आली.

या मंदिराच्या अवती भवती पांडवकालीन खुणा आढळतात त्यामुळे इथ पांडवांचा अधिवास होता याचा इतिहास साक्ष देतो. या ठिकाणी वस्ती केल्यानंतर हे मंदीर पांडवांनी एका रात्रीत उभे करण्याचे शक्य तेवढे प्रयत्न केले. मात्र सकाळी उजाडताच ते इथून निघून गेले हा इतिहासही सांगण्यात येतो आणि तशा इतिहासाच्या खुणाही या भागात पहायला मिळतात. या मंदिरात शिवलिंग, पींडी आणि पुरातन मुर्त्या आहेत. दरवर्षी याठिकाणी शिवरात्रीला उत्सव असतो. ज्यावेळी इथ साधी बसण्याची ही व्यवस्था नव्हती तिथं अथक मेहनतिने ग्रमस्थानी सुसज्ज जागा तयार केली.

श्री देव सपतनाथ मंदिर ५ मार्च रोजी सायंकाळी सूर्यास्त झाल्यावर बांधायला सुरु होईल. सूर्योदय होण्याआगोदर बांधकाम पूर्ण करण्यात येणार आहे. ६ मार्च रोजी मंदिराची सजावट तसेच रात्री शिमदाड्याची भजने होतील.

७ मार्च रोजी श्री देव सपतनाच्या गाभाऱ्यातील देवतांच्या मूर्तीची पुनप्रतिष्ठापना होईल. ८ मार्च महाशिवरात्र दिवशी सकाळी १० वाजता सत्यनारायण महापूजा, आरती, महाप्रसाद, सायंकाळी ६ नंतर भजन स्पर्धा व त्यानंतर रात्रभर भजनाचा जागर होईल.