सिंधुवैभव ॲग्रो फार्मर प्रोड्युसर कंपनी यांच्यावतीने सर्व काजु उत्पादक शेतकऱ्यांनी 6 मार्च रोजीआपली नांवे नोंदणी करावी

वैभववाडी,दि.४ मार्च
सिंधुवैभव ॲग्रो फार्मर प्रोड्युसर कंपनी (श्री महेश गोखले व त्यांचे सहकारी) यांच्यावतीने बुधवार दि.6 मार्च रोजी सकाळी 10 वाजले पासुन , वैभववाडी तालुका सहकारी खरेदी- विक्री संघ येथे वैभववाडी  तालुक्यातील स्थानिक काजु उत्पादक शेतकऱ्यांची  उत्तम प्रतिची व विक्री योग्य काजु बी 120 रुपये प्रति किलो दराप्रमाणे खरेदी करणार असुन सर्व काजु उत्पादक शेतकऱ्यांनी आपली नांवे नोंदणी करावी. असे आवाहन
वैभववाडी ता.ख.वि .संघांचे चेअरमन प्रमोद रावराणे यांनी केले आहे.