मालवण,दि.४ मार्च
बॅ. नाथ पै सेवांगण शाखा कट्टा, बॅ. नाथ पै वाचन मंदिर कट्टा व केंद्रशाळा कट्टा नं १ यांच्या संयुक्त विद्यमाने केंद्रशाळा कट्टा येथे विविध उपक्रमाद्वारे मराठी भाषा गौरव दिन साजरा झाला. यावेळी आयोजित मराठी हस्ताक्षर स्पर्धेत ६० विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला तर हस्तकला स्पर्धेत ५० विद्यार्थ्यांनी हस्तकलेच्या वस्तू बनवल्या. तसेच विविध पुस्तकांचे प्रदर्शन संपन्न झाले.
या कार्यक्रमात कट्टा केंद्रशाळा नं. १ च्या विद्यार्थिनीनी बोलतो मराठी या गाण्यावर नृत्य सादर केले व छोटी नाटिका सादर केली. तर विद्यार्थ्यानी छोट्या कथा व कविता सादर केल्या. शाळेच्या सहशिक्षिका संपदा भाट यांनी मराठी भाषा दिनाचे महत्व विद्यार्थ्याना समजावून सांगितले. दीपक भोगटे यांनी आपण मराठी शाळेत शिकत आहात हे अभिमानास्पद आहे, सर्वांनी मराठी भाषा जास्तीत जास्त वाचन करून समृद्ध करूया, असे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना सांगितले.
स्पर्धेचा निकाल पुढीलप्रमाणे – हस्ताक्षर स्पर्धा – इयत्ता पहिली – प्रथम पूजा रावले, द्वितीय पावनी सावंत, तृतीय आराध्या ढोलम, इयत्ता दुसरी – प्रथम वेदीका हुले, द्वितीय मिथील गुराम, तृतीय साहील रजपूत, इयत्ता तिसरी – प्रथम हर्षिल मालवदे, द्वितीय रुद्र पोटफोडे, तृतीय दुर्वा चिरमुले, इयत्ता चौथी – प्रथम सिध्दी गुराम, द्वितीय वेदिका भोजणे, तृतीय कुंजन फाटक.
हस्तकला स्पर्धा – इयत्ता पहिली – प्रथम पावनी सावंत, द्वितीय जय ढोलम, इयत्ता दुसरी -प्रथम रेवा साळोखे, द्वितीय साहील रजपूत, इयत्ता तिसरी – प्रथम मिताली वारंग, द्वितीय वेदा जाधव, इयत्ता चौथी – प्रथम श्लोक चांदरकर, द्वितीय तनुश्री वालावलकर.
हस्ताक्षर व हस्तकला स्पर्धेतील यशस्वी विद्यार्थ्याना पुस्तक व प्रशस्तीपत्र देऊन मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आले. मुख्याध्यापक श्री. ठाकूर यांनी आभार मानले. या कार्यक्रमास बॅ. नाथ पै सेवांगणचे कार्याध्यक्ष किशोर शिरोडकर विश्वस्त विकास म्हाडगुत दीपक भोगटे कार्यकारिणी सदस्या वीणा म्हाडगुत, कट्टा कार्यकारिणी सदस्य बापू तळावडेकर, समीर चांदरकर, ग्रंथपाल सुजाता पावसकर, श्रीधर गौधळी, संतोष गिरकर, संपदा भाट, शिवण क्लासच्या विद्यार्थिनी पालक व विद्यार्थी उपस्थित होते.