महारोजगार मेळाव्याच्या माध्यमातुन बेरोजगारांना मदतीचा हात मिळेल -आम. नितेश राणे

कणकवलीत पंडित दीनदयाळ उपाध्याय महारोजगार व स्वयंरोजगार मेळाव्याचे उद्घाटन

कणकवली ४ मार्च (भगवान लोके)-

अनेक रोजगार मेळावे मी स्वतः यापूर्वी घेतले आहेत.लाखो बेरोजगारांना रोजगार दिले आहेत.त्यामुळे शासनाची प्रतिमा अजून उजळू शकते असा हा कार्यक्रम आहे. शासनाला त्याचा फायदा आणि जनतेला लाभ, बेरोजगारांना मदतीचा हात मिळेल असे मेळावे झाले पाहिजेत अशी अपेक्षा आम. नितेश राणे यांनी व्यक्त केली.स्वतःच्या आणि कुटुंबाच्या कल्याणासाठी महायुती सरकारच्या योजनांचा फायदा घ्यावा असे आवाहन आम. नितेश राणे यांनी केले.

जिल्हा कौशल्य विकास,रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र,सिंधुदुर्ग कणकवली कॉलेज कणकवली,आय.टी.आय. फोंडाघाट,देवगड,वैभववाडी यांच्या संयुक्त विद्यमाने पंडित दीनदयाळ उपाध्याय भव्य महारोजगार मेळावा कार्यक्रमाचे उद्घाटन आमदार नितेश राणे यांच्या शुभहस्ते करण्यात आले.यावेळी जिल्हा कौशल्य विकास अधिकारी श्री.गणेश चीमनकर, कणकवली कॉलेजच्या चेअरमन डॉ.राजश्री साळुंखे, माजी जि.प.अध्यक्ष संदेश उर्फ गोट्या सावंत,माजी नगराध्यक्ष समीर नलावडे,भाजप महीला प्रदेश उपाध्यक्ष प्रज्ञा ढवण, कणकवली कॉलेजचे प्राचार्य युवराज महालिंगे,माजी उपसभापती बुलंद पटेल, डॉ.साळुंखे, माजी नगरसेवक मेघा गांगण, भाजप कणकवली तालुका अध्यक्ष मिलिंद मेस्त्री,अण्णा कोदे, प्रा. त्रिपूडेकर,बंडू हर्णे,किशोर राणे आदी उपस्थित होते.

आम.नितेश राणे म्हणाले, राज्यातील महायुतीचे शासन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे,उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, दुसरे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या नेतृत्वाखाली जनतेच्या कल्याणासाठी काम करत आहे. रोजगार आणि स्वयंरोजगार विभागाचे मंत्री मंगलप्रभात लोढा हे बेरोजगारांसाठी तळमळीने राज्यभर रोजगार,स्वयंरोजगार मेळावे घेऊन तरुणांना संधी उपलब्ध करून देत आहेत.या सर्व गोष्टींचा फायदा बेरोजगार आणि स्वयंरोजगार करू इच्छिणाऱ्या युवक युवतीनी घ्यावा.
आम.नितेश राणे पुढे म्हणाले,ना. मंगलप्रभात लोढा यांनी हा मेळावा घेण्याचे मान्य केले.मात्र प्रशासन स्थरावर अधिक तयारी होणे अपेक्षित होते मात्र ती झाली नाही
दोन हातांना काम देवू शकतो. व्यवसायाची सुरुवात केली जावू शकते. असेच रोजगार मेळावे घ्या.लोकसभा निवडणूक झाल्यावर भव्य मेळावा पुन्हा एकदा घेवून सरकारची योजना जनतेपर्यंत पोहचवू आणि नोकऱ्या मिळवून देवू असे आम. नितेश राणे यांनी सांगितले. उपस्थित युवक,युवतींना आत्मविश्वासाने मुलाखती द्या असे आवाहन केले .तुमची निवड नक्कीच होईल.असा विश्वास आमदार नितेश राणे यांनी दिला.

यावेळी डॉ.राजश्री साळुंखे,जिल्हा कौशल्य विकास अधिकारी गणेश चीमनकर,डॉ.साळुंखे यांनी आपले विचार मांडले.प्रा. हरिभाऊ भिसे यांनी सूत्र संचालन केले.