नांदगावच्या स्मृती मोरये “पारंगत अभिनेत्री” पुरस्कार

कणकवली ४ मार्च(भगवान लोके)
नांदगाव येथील असलेल्या स्मृती मोरये हिला बहुचर्चित सुमित्रा या एकांकिकेमधील भूमिकेसाठी नामांकित ‘अस्तित्व’ या संस्थेचा “पारंगत अभिनेत्री” हा पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. हा पुरस्कार ज्येष्ठ अभिनेत्री निवेदिता सराफ यांच्या हस्ते विशेष कार्यक्रमात देऊन गौरविण्यात आले. याबद्दल तिचे सर्वत्र अभिनंदन केले जात आहे.

स्मृती मोऱये हिने अभिनय केलेली उकळी या एकांकेनेही गेल्यावर्षी सर्वच स्पर्धांमध्ये महाविद्यालयीन गटात अव्वल स्थान ठेवले होते. गतवर्षी किर्ती एम. डूंगरसी महाविद्यालयाच्या उकळी या एकांकिकेने चतुरंग सवाई एकांकिका स्पर्धा, लोकसत्ता लोकांकिका अशा नामांकित स्पर्धेत यश संपादन केले होते.

त्यानंतर सुमित्रा ही एकांकिकामध्येही स्मृती मोरये हिने उत्तम अभिनय करून सर्वांचेच लक्ष वेधले होते. या तिच्या उत्कृष्ट अभिनयाबद्दल समीक्षक पसंती पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. विशेष म्हणजे मोरये यांच्याकडे अभिनयाचा कोणताही वारसा नसताना ती या क्षेत्रात उत्तुंग कामगिरी करत आहे.

यापूर्वीही अनेकदा सर्वोत्तम अभिनेत्री (चौकट)
स्मृती हिला अभिनयाची पारितोषिके अनेक नामांकित स्पर्धेत मिळाली आहेत. तिने आपल्या अभिनयाची छाप अनेक परीक्षक, समीक्षक आणि प्रेक्षकांवर पाडली आहे. त्यामुळे सवाई एकांकिका स्पर्धा, लोकसत्ता लोकांकीका अशा विविध स्पर्धेत अभिनयाची पारितोषिके प्राप्त झाली आहेत.

स्मृती ही किर्ती एम. डूंगरसी महाविद्यालयाकडून विविध महाविद्यालयीन एकांकिका स्पर्धेत सहभागी होत आहे. यासाठी तिचे कुटुंब, महाविद्यालय आणि सहकारी यांचे बहुमोल सहकार्य मिळत आहे. तर मुंबई विद्यापीठाच्या युथ फेस्टिवल मध्ये सिल्व्हर मेडल प्राप्त केले आहे.