मालवण,दि.४ मार्च
मालवण शहर मेढा राजकोट येथील ठाकरे गटाचे वार्ड अध्यक्ष लुईस रॉड्रिक्स यांसह अनेक सहकाऱ्यांनी मालवणचे उद्योजक तथा शिवसेना युवा नेते सतीश आचरेकर, सहदेव बापर्डेकर यांच्या नेतृत्वाखाली रत्नागिरी सिंधुदुर्ग शिवसेना नेते किरण उर्फ भैयाशेठ सामंत यांच्या उपस्थितीत रत्नागिरी येथे शिवसेनेत प्रवेश केला आहे.
मेढा राजकोट येथील ठाकरे गटाचे वार्ड अध्यक्ष लुईस रॉड्रिक्स हे उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्षाचे सक्रिय पदाधिकारी होते त्यांनी
उद्योजक तथा युवा नेते सतीश आचरेकर, सहदेव बापर्डेकर, हिमांशू बापर्डेकर, ओमकार खंदारे, परिपोष बापर्डेकर यांच्या पुढाकारातून शिवसेना शिंदे गटात प्रवेश करण्याचा निर्णय घेतला त्यांच्या उपस्थितीत हा पक्ष प्रवेश संपन्न झाला.
लुईस (पपो) रॉड्रिक्स यांसह शावियर फर्नाडीस, योगेश मंडलीक, यतीन मंडलीक, फ्रान्सिस फर्नाडीस, संदीप साटम, प्रशांत दुधवडकर, संजय चिंदरकर, प्रतिक पराडकर यांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे.