दोडामार्ग ते विजघर मार्गावर पर जिल्ह्यातील ठेकेदाराकडून बोगस कामाचा स्थानिक ठेकेदार ग्रामस्थ यांनी केला पर्दाफाश अधिकारी यांना बोलावून कामे केली बंद

दोडामार्ग, दि. ४ मार्च 

सार्वजनिक बांधकाम विभाग दोडामार्ग यांच्या वतीने दोडामार्ग ते विजघर या तीस किलोमीटर लांबीच्या रस्त्यावर अनेक ठिकाणी खचलेल्या मोऱ्या नदी ओढे येथे खचलेले रस्ते गटार या ठिकाणी दुरुस्ती वाॅल बांधकाम करणे यासाठी कोटी रुपये निधी उपलब्ध करून दिला आहे. ही कामे बिलो टाकून पर जिल्ह्यातील ठेकेदार यांनी घेऊन कामे सुरू केली. पण ही कामे नियमात नाही खाली फाऊंडेशन नाही गटार खाली वर बांधकाम करुन थुंकी लावली जात होती. हे काम सोमवारी दोडामार्ग तालुक्यातील स्थानिक ठेकेदार ग्रामस्थ सरपंच यांनी या बोगस कामांचा पदाफार्श केला या नंतर बांधकाम विभाग अधिकारी यांना घटनास्थळी आणून वस्तूस्थिती दाखवली पण संबंधित ठेकेदार घटनास्थळी आला नाही कामगार यांना पाठवले. अशी बोगस कामे खपवून घेतली जाणार नाही असा इशारा देत कामे बंद केली.