कार चालकांवर दोडामार्ग पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल कालकुद्री गावात शोककळा
दोडामार्ग, दि. ४ मार्च
दोडामार्ग ते बेळगाव कोल्हापूर मार्गावर रविवारी रात्री वायंगणतड नजीक गोवा येथील कार तसेच मोटार सायकल दरम्यान झालेल्या अपघातात चंदगड कालकुद्री येथील तरुण सुमीत परशुराम पाटील वय वर्षे २७ याचा मृत्यू झाला. तर सोबत असलेला औंकार विठ्ठल पाटील वय २४ हा किरकोळ जखमी झाला. या अपघात प्रकरणी औंकार पाटील याने दिलेल्या फिर्यादीवरुन म्हापसा गोवा येथील कार चालक राजेश शामसुंदर गोसावी याच्यावर अपघात प्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.अशी माहिती पोलिस निरीक्षक निसर्ग ओतारी यांनी दिली. सोमवारी सकाळी साटेली भेडशी आरोग्य केंद्र वैद्यकीय अधिकारी डॉ. जगदीश पाटील यांनी शवविच्छेदन केल्यावर मृतदेह नातेवाईक यांच्या ताब्यात देण्यात आला. सुमीत पाटील याच्या अपघाती निधनामुळे कालकुद्री गावात शोककळा पसरली आहे. सोमवारी दुपारी कालकुद्री येथे सुमीत पाटील वर अंत्यसंस्कार करण्यात आले.