कणकवली छत्रपती शिवाजी महाराज चौक ते बाजारपेठ मार्गे मेळावा स्थळापर्यंत काढली रॅली
कणकवली दि.१४ जानेवारी(भगवान लोके)
कणकवली येथे भारतीय जनता पार्टी शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस या सह महायुतीतील घटक पक्षांचा भव्य मेळावा होत आहे त्या पार्श्वभूमीवर कणकवली शहरातून भव्य रॅली महायुतीच्या कार्यकर्त्यांनी काढली आहे. या रॅलीचा शुभारंभ भाजपा जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत,भाजपा उपाध्यक्ष गोट्या सावंत ,राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष अबिद नाईक,शिवसेना जिल्हाप्रमुख संजय आग्रे यांच्यासह प्रमुख नेत्यांनी केला.