देवगड ,दि.४ मार्च
माजी विद्यार्थी संघ,डॉक्टर श्री.र.लेले हायस्कूल मुटाट यांच्या वतीने मुलांसाठी प्रश्नमंच स्पर्धेचे आयोजन.
मुटाट पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळ संचलित डॉक्टर श्री.र.लेले हायस्कूलचे आद्य संस्थापक तथा जगप्रसिद्ध काच तज्ज्ञ डॉ. श्रीधर रघुनाथ लेले यांच्या एक मार्च ह्या जयंती दिनी माजी विद्यार्थी संघाने इयत्ता पाचवी ते सातवी व इयत्ता आठवी ते नववी अशा दोन गटांमध्ये त्यांच्या अभ्यासक्रमावर आधारित प्रश्नमंच स्पर्धेचे आयोजन केले होते. डॉक्टर लेले यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून व दीप प्रज्वलित करून प्रश्नमंच स्पर्धेला सुरुवात करण्यात आली. इयत्ता पाचवी ते सातवी या गटात प्रत्येकी दोन मुलांचे आठ गट सहभागी झाले होते तर इयत्ता आठवी ते नववी या गटात प्रत्येकी दोन विद्यार्थ्यांचे पाच गट सहभागी झाले होते. इयत्ता पाचवी ते सातवी या गटात सर्वोत्तम गुण मिळवून सम्यक साळुंखे आणि सोहम घाटे यांनी प्रथम क्रमांक पटकावला तर सिद्धी घाटे आणि अंचल देसाई यांनी द्वितीय क्रमांक पटकावला. इयत्ता आठवी ते नववी या गटात सर्वोत्तम गुण मिळवत देवांग परांजपे आणि संचित परब यांनी प्रथम क्रमांक पटकाविला तर द्वितीय क्रमांक आदिती साळुंखे आणि मैथिली पाळेकर यांनी पटकावला. विजेत्या स्पर्धकांना आकर्षक चषक व रोख स्वरूपाचे पारितोषिक मान्यवरांच्या हस्ते देण्यात आले.
पारितोषिक वितरणासाठी संस्थेच्या उपाध्यक्ष तथा डॉक्टर लेले यांच्या सुकन्या प्रसिद्धल जनुकीय तज्ञ डॉ. हेमाताई पुरंदरे मॅडम उपस्थित होत्या. या प्रश्नमंच स्पर्धेचे आयोजन माजी विद्यार्थी संघाचे अध्यक्ष श्री. सूर्यकांत साळुंखे, उपाध्यक्ष. भाई चव्हाण, सल्लागार . यशवंत पाळेकर,सचिव श्री. अमेय घाटे, कार्यकारी समितीचे सदस्य प्रकाश तिर्लोटकर व अन्य सदस्य यांनी केले होते.या स्पर्धा आयोजनासाठी हायस्कूलचे मुख्याध्यापक. दिलीप घरपणकर यांचे उत्तम मार्गदर्शन मिळाले. तसेच हायस्कूलचे उपक्रमशील शिक्षक अनिल घुगे, निलेश तांबे, अशोक देसाई, श्री. पाडावे व . चेतन पाळेकर यांनी सहकार्य केले.
Home आपलं सिंधुदुर्ग लेले हायस्कूल मुटाटचे आद्य संस्थापक तथा प्रसिद्ध काच तज्ज्ञ डॉक्टर श्रीधर रघुनाथ...