कुडाळ,दि.४ मार्च
ग्राम विकास विभाग, महाराष्ट्र शासनाच्या वतीने सन २०२०-२१ चे यशवंत पंचायत राज अभियान अंतर्गत पुरस्कार वितरण सोहळा विभागीय आयुक्त कोकण विभाग यांचे हस्ते समिती सभागृह, कोकण भवन या ठिकाणी वितरित करण्यात आला. यामध्ये पंचायत समिती कुडाळला राज्य स्तर प्रथम क्रमांक व कोकण विभाग स्तर प्रथम क्रमांक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. पुरस्कार वितरण विभागीय आयुक्त , कोकण विभाग डॉ महेंद्र कल्याणकर यांचे शुभहस्ते प्रदान करण्यात आला.रोख 31 लाख, सन्मानपत्र, सन्मानचिन्ह असे पुरस्काराचे स्वरूप आहे
पुरस्कार वितरण प्रसंगी मुंबई जिल्हाधिकारी संजय जाधव रायगड जिल्हाधिकारी किसनजी. सिंधुदूर्ग जिल्हाधिकारी श्री किशोर तावडे मुख्य कार्यकारी अधिकारी पालघर भानुदास पालवे आदी उपस्थित होते पंचायत समिती कुडाळच्या वतीने तत्कालिन सभापती नुतन आईर , उपसभापती जयभारत पालव , तत्कालीन गट विकास अधिकारी श्री विजय चव्हाण, सध्याचे गट विकास अधिकारी धनंजय जगताप, सहाय्यक गटविकास अधिकारी श्याम चव्हाण, बाळकृष्ण परब, धनश्री शेडगे,रवि पोवार , महादेव तेली , पूजा डेगवेकर , शेखर माळकर, व सुदेश सुर्वे यांनी हा सन्मान स्विकारला. यशवंत पंचायत राज अभियान मध्ये यापूर्वीही सलग 2 वर्ष कोकण विभागात प्रथम आणि राज्य स्तरावरील प्रथम पुरस्कार प्राप्त झाला आहे. महाआवास अभियान मध्ये प्रधानमंत्री आवास योजनेत राज्यस्तरीय प्रथम तर रमाई आवास मध्ये राज्यस्तरीय द्वितीय क्रमांक मिळाला आहे.माझे घर माझा शोषखड्डा अभियानात 10000 पेक्षा जास्त शोषखड्डे पाडून कोरोना कालावधीत बंद चुली पेटवीनेस हातभार लावल्याबाबत महाराष्ट्र शासनाने विशेष पुरस्कार देऊन पंचायत समिती कुडाळला गौरविले आहे.
यशवंत पंचायत अभियानात घरकुल योजना, नरेगा योजना, कुपोषण मुक्ती, बंधारे, पशुसवर्धन योजना, जलजीवन अभियान,. मेरी माटी मेरा देश, कुटुंब कल्याण, अश्या विविध योजनेत सन 2020/2021 या आर्थिक वर्षात कुडाळ पंचायत समितीने केलेल्या दैदीप्यमान कामगिरी मुळे सलग तिसऱ्या वर्षी राज्यात प्रथम क्रमांक पटकविले आहे. रोख 31 लाख, सन्मानपत्र, सन्मानचिन्ह असा पुरस्कार देऊन गौरविण्यात आले श्रावणमेळा, रानभाज्या महोत्सव, विधवा सन्मान सोहळा,वृद्ध कलाकार सन्मान सोहळा, कृषी पशु पक्षी पर्यटन मेळा आदी नाविन्यपूर्ण उपक्रमही पंचायत समिती कुडाळने तत्कालीन गटविकास अधिकारी विजय चव्हाण व त्यांच्या टीमने राबवून राज्यात पंचायत समिती कुडाळला दैदिप्यमान यश मिळवून दिले या यशात सर्व आजी माजी लोकप्रतिनिधी कुडाळ तालुक्यातील सर्व जनता आजी माजी अधिकारी यांचे सहकार्य लाभले असे विजय चव्हाण यांनी सांगितले
मुंबई
सन २०२०-२१ चे यशवंत पंचायत राज अभियान अंतर्गत राज्य स्तर प्रथम क्रमांक व कोकण विभाग स्तर प्रथम क्रमांक पुरस्कार स्वीकारताना नूतन आईर जयभारत पालव विजय चव्हाण धनंजय जगताप अधिकारी व कर्मचारी वर्ग