मालवणात ९ व १० रोजी स्मृतिलिला बॅडमिंटन स्पर्धा

मालवण,दि.४ मार्च

कै. लिलाधर गणेश हडकर स्मृतिप्रीत्यर्थ पिंटो सी फुड मालवण पुरस्कृत मालवण तालुका मर्यादित
स्मृतिलिला बॅडमिंटन स्पर्धा २०२४ चे आयोजन दि. ९ व १० मार्च रोजी मालवण येथील जय गणेश इंग्लीश मिडीयम स्कुलमध्ये करण्यात आले आहे.

११ वर्षा खालील मुलगे व मुली एकत्रित सिंगल, १५ वर्षा खालील मुलगे प्रथम, १५ वर्षाखालील मुली सिंगल, १९ वर्षा खालील मुलगे सिंगल, १९ वर्षा खालील मुली, खुला गट पुरुष, महिला खुला गट, खुला गट फक्त पुरुष डबल अशा विविध गटामध्ये हि स्पर्धा घेण्यात येणार असून विजेत्यांना रोख बक्षिस व आकर्षक चषक देण्यात येणार आहे. स्पर्धेत भाग घेऊ इच्छिणाऱ्या खेळाडूनी आपली नावे ७ मार्च पर्यंत नोंदवावीत व अधिक माहितीसाठी महेश परब 9404778899, सुजन परब 7741988400 यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.