मालवण,दि.४ मार्च
मालवण येथील दिवाणी न्यायालयात रविवारी झालेल्या राष्ट्रीय लोकअदालतीमध्ये एकुण ६९ प्रकरणे तडजोडीने निकाली काढण्यात आली.
या लोक अदालती मध्ये दिवाणी न्यायालय क.स्तर मालवण न्यायालयातील एकुण ३२४ प्रलंबित प्रकरणे व वादपुर्व १०७८ प्रकरणे अशी एकूण १३२६ प्रकरणे ठेवण्यात आली होती. यात मालवण तालुक्यातील राष्ट्रीयकृत बँका, ग्रामपंचायत, महाराष्ट्र राज्य विज वितरण कंपनी तसेच वाहतुक पोलीसांमार्फत ई-चलन प्रकरणे अशा प्रकारच्या वादपूर्व प्रकारणांचा समावेश होता. त्यापैकी प्रलंबित प्रकरणांपैकी १६ प्रकरणे व वादपूर्व प्रकरणांपैकी ४६ प्रकरणे, तसेच पोलीसांकडील वाहतुक शाखेकडील ई-चलन ७ प्रकरणे अशी मिळून एकुण ६९ प्रकरणे तडजोडीने मिटवून निकाली काढण्यात आली. यामध्ये प्रलंबित, वादपुर्व व ई-चलन मधील एकूण रक्कम रुपये ९,६४,४८६/- एवढी झालेली आहे.
या लोक अदालतीसाठी एक पॅनल नियुक्त करण्यात आले होते. पॅनल प्रमुख दिवाणी न्यायाधीश, मालवण तथा तालुका विधी सेवा समिती मालवणचे अध्यक्ष श्री. महेश रा. देवकते यांनी यांच्यासह विधिज्ञ श्री. सुमित जाधव, यांनी पॅनेल सदस्य म्हणुन या अदालतीसाठी काम पाहीले. तसेच न्यायालयाचे कर्मचारी सहायक अधीक्षक, श्री.एम.जी.डीसोजा, लघुलेखक, श्रीम.डि.डि.परब, वरिष्ठ लिपिक, श्रीम.यु.एन. मालणकर कनिष्ठ लिपिक, श्री.ए.एस. हळदणकर, श्री. एस.व्ही.परब, श्री.एल.आर. कांबळी, श्रीम.एस.व्ही. जाधव, श्री.सी.एम. गोसावी, चपराशी, श्री.एस.ए.चव्हाण, श्री.एस.बी. चिंदरकर यांचे सहकार्य लाभले.