शिवसेना नेते किरण सामंत यांची युवा उद्योजक प्रितम गावडे यांनी घेतली भेट

मालवण,दि.४ मार्च

मालवण येथील युवा उद्योजक तथा सामाजिक कार्यकर्ते प्रितम गावडे यांनी मनसे मालवण तालुकाध्यक्ष पदाचा रविवारी राजीनामा दिल्यानंतर मालवणचे उद्योजक तथा युवा नेते सतीश आचरेकर यांच्या पुढाकारातून प्रितम गावडे यांनी अनेक सहकाऱ्यांसह शिवसेना रत्नागिरी सिंधुदुर्ग नेते किरण उर्फ भैयाशेठ सामंत यांची रत्नागिरी येथे भेट घेतली.
यावेळी प्रितम गावडे यांनी शिवसेना नेते भैयाशेठ सामंत यांच्या मार्गदर्शनाखाली सतीश आचरेकर यांच्या सोबतीने कार्यरत राहणार असल्याचे सांगत मनसे पक्ष सोडचिट्ठी वर शिक्कामोर्तब केले

मालवणचे तरुण उद्योजक प्रितम गावडे यांनी आपल्या मित्रपरिवारासह वर्षभरापूर्वी मनसेत प्रवेश केला होता त्यानंतर त्यांच्यावर मनसे तालुकाध्यक्षपदाची जबाबदारी देण्यात आली होती तालुकाध्यक्ष म्हंणून काम करताना श्री गावडे यांनी अनेक उपक्रम राबविले सर्वसामान्य जनतेतून कोणीही कुठलीही समस्या घेऊन आला तर ती समस्या आपण प्राधान्याने सोडवली पाहिजे या हेतूने प्रितम गावडे यांनी काम केल्याने ते जनमानसात लोकप्रिय ठरले जनतेचे शासन प्रशासन स्तरावरील प्रश्न सोडवताना अधिकाधिक सेवा करता यावी व करण्यासाठी शिवसेना नेते भैयाशेठ सामंत यांच्या मार्गदर्शनाखाली सतीश आचरेकर यांच्या सोबतीने कार्यरत राहणार आहे. असे प्रितम गावडे यांनी सांगितले.

यावेळी विविध विषयांवर सकारात्मक चर्चा झाली. सामाजिक क्षेत्रात काम करत असताना जनतेच्या समस्या सोडवण्यासाठी, विकासकामे यासाठी शिवसेना, भाजप, राष्ट्रवादी युती सरकारच्या माध्यमातून सहकार्य मिळवून देण्यासाठी आपण प्रयत्नशील व सोबत असल्याचा विश्वास किरण सामंत यांनी व्यक्त केला.