देवगड,दि.०५ मार्च
आजी-माजी विद्यार्थी तसेच सांडवे पंचक्रोशीतील ग्रामस्थ यांच्या सर्वांच्या सहकार्यामुळेच शाळेच्या भौतिक व इतर शैक्षणिक सुविधा पूर्ण करू शकले . असे विचार सांडवे हायस्कूलच्या नियत वयोमानानुसार सेवानिवृत्त झालेल्या मुख्याध्यापिका सौ सुगंधा भिडे यांनी आपल्या निरोप समारंभ प्रसंगी मांडले
याप्रसंगी व्यासपीठावर निरोम ग्रामस्थ मंडळाचे सुधीर राऊत सांडवे ग्रामस्थ जयवंत मसुरकर नूतन मुख्याध्यापक महेश जाधव इ मान्यवर उपस्थित होते
आपले विचार व्यक्त करताना सौ भिडे पुढे म्हणाल्या सांडवे पंचक्रोशीतील सर्व माजी विद्यार्थी ग्रामस्थ शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी वर्ग यांच्या योगदानामुळेच शाळेच्या पुनर्बांधणीचे काम आम्ही पूर्ण करू शकलो .यामध्ये सर्वांचेच मोठे योगदान आहे. या शाळेची आणि ग्रामस्थांची सदैव ऋणी आहे या शाळेने केव्हाही निमंत्रित केल्यास माझ्या परीने या शाळेसाठी निश्चितच योगदान देईन या शाळेत विविध प्रकारचे शैक्षणिक कोर्सेस सुरू होण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करावेत असेही त्या शेवटी म्हणाल्या
याप्रसंगी सुधीर राऊत जयवंत मसुरकर विजय मसुरकर, संजीव राऊत यांनी आपले मनोगत व्यक्त केले याप्रसंगी निरोम ग्रामस्थ मंडळाचे सुधीर राऊत यांचा सत्कार शाळेच्या वतीने करण्यात आला तसेच शाळेचे नूतन मुख्याध्यापक महेश जाधव यांचाही ,निरोम व सांडवे ग्रामस्थांच्या वतीने सत्कार करण्यात आला. त्यांनीही ही शाळा शैक्षणिक दृष्ट्या प्रगती होण्यासाठी सर्वांच्या सहकार्याने प्रयत्नशील राहू असे सांगितले. याप्रसंगी गिरीश मसुरकर (कणकवली )यांनी सौ भिडे यांच्या कार्यकर्तृत्वाचा आढावा घेऊन त्यांना सन्मानपत्र देऊन सत्कार केला. या कार्यक्रमास श्री मंगेश राऊत (निरोम) तसेच सांडवे पंचक्रोशीतील ग्रामस्थ माजी विद्यार्थी , शिक्षण प्रेमी, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्रीयुत विशाल पारकर यांनी केले सुरुवातीस शाळेचे माजी विद्यार्थी कै मोहन गंगाराम कोदे यांना श्रद्धांजली वाहण्यात आली.