विजयदुर्ग पोलीस स्थानकाचे सहा. पोलीस निरीक्षक मनोज सोनवलकर यांनी ज्येष्ठ नागरिकांशी संवाद साधला

देवगड,दि.०५ मार्च
विजयदुर्ग पोलीस स्थानकाचे सहा. पोलीस निरीक्षक मनोज सोनवलकर यांनी जेष्ठ नागरिक जनजागृती अभियान अनुषंगाने वाघोटन गावामध्ये ज्येष्ठ नागरिकांशी संवाद साधला त्यांना अडचणी बाबत माहिती घेतली असता त्यांनी तसेच काही अडचण असल्यास हेल्पलाईन नंबर ११२ वर संपर्क साधण्याचे आवाहन केले. त्यांना ऑनलाईन fraud /सायबर fraud विषयी सुरक्षा बाबत आवश्यक ती माहिती दिली. सरकारी योजनाची माहिती देण्यात आली .अधिकारी व बीट अंमलदार यांचे मोबाईल नंबर ज्येष्ठ नागरिक यांना देण्यात आले या बैठकीला सुमारे २५ ज्येष्ठ नागरिक उपस्थित होते.

तसेच वाघोटन गावातील मतदान केंद्राला भेट दिली त्यावेळी शिक्षकांचे विनंती नुसार जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांना मुलींची सुरक्षितता व सायबर क्राईम बाबत मार्गदर्शन केले.