उद्योजक प्रकाश मेस्त्री यांच्या हस्ते दिमाखात उदघाटन
आचरा,दि.०५ मार्च
मालवण तालुक्यातील पळसंब येथील सरपंच महेश वरक व मित्र मंडळाच्यावतीने पळसंब वरचीवाडी ग्रीन पार्क स्टेडीयम येथे आयोजित सरपंच चषक 2024 चे उदघाट्न आज सरपंच महेश वरक यांच्या उपस्थितीत उद्योजक प्रकाश मेस्त्री यांच्या हस्ते दिमाखात करण्यात आला. स्पर्धेसाठी विविध आकर्षक बक्षीसे ठेवण्यात आली असून 14 संघात हि स्पर्धा रंगणार आहे.
यावेळी चिंदर उपसरपंच दिपक सुर्वे, पळसंब माजी उपसरपंच सुहास सावंत, दत्तगुरु परब, अक्षय परब, बबन पुजारे, अशोक जुवेकर, तुलसीदास चव्हाण, पपू सावंत, गणेश सावंत, श्रीधर सावंत, राजू भोगटे, बबलू सावंत, घाडीगांवकर, नरी सावंत, कुणाल सावंत, महेश वायंगणकर, आदी उपस्थित होते.