कोल्हापूर ते पणजी कोल्हापूर बस पुन्हा सुरू प्रवाशांनी लाभ घेण्याचे आवाहन

दोडामार्ग, दि. ५ मार्च 

गेल्या काही महिन्यांपासून बसेस संख्या कमी असल्याने बंद असलेली कागल डेपोची कोल्हापूर ते पणजी कोल्हापूर ही बस मंगळवार पासून पुन्हा सुरू केली आहे. तरी प्रवाशांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन कागद आगार प्रमुख यांनी केले आहे.
गेल्या अनेक वर्षांपासून सुरू असलेली कोल्हापूर ते पणजी कोल्हापूर बस गेले काही महिने बसेस कमी असल्याने बंद केली होती. एकच बस सुरू होती यामुळे मोठी गैरसोय होत होती. कोल्हापूर येथे जाण्यासाठी तिलारी चंदगड मार्गे शेवटची बस होती. त्यामुळे ही बस तातडीने सुरू करावी अशी मागणी प्रवाशांनी केली होती. तसे लेखी पञ कागल कोल्हापूर डेपो यांना दिले होते. अखेर मंगळवारी बस सुरू झाली यामुळे समाधान व्यक्त केले जात आहे.

कोल्हापूर येथून सकाळी ही बस साडेसात वाजता सुटते कागल निपाणी,
गडहिंग्लज, नेसरी, चंदगड तिलारीनगर,
विजघर, तेरवण मेढे, साटेली भेडशी झरेबांबर, दोडामार्ग, अस्नोडा, म्हापसा गोवा पणजी असा प्रवास करत पुन्हा दुपारी तीन वाजता पणजी येथून सुटणार आहे. दोडामार्ग येथे चार वाजता येईल.छ तरी दोडामार्ग चंदगड तसेच इतर गावातील प्रवाशांनी लाभ घ्यावा असे आवाहन केले आहे.