आजगाव हायस्कूलमध्ये ‘परीक्षेच्या उंबरठ्यावर’

0

सावंतवाडी,दि.१४ जनेवारी
आजगाव येथील विद्या विहार इंग्लिश स्कूलच्या दहावीच्या मुलांसाठी परीक्षे संबंधी मार्गदर्शन नुकतेच पार पडले. ‘परीक्षेच्या उंबरठ्यावर’ या व्याख्यानात गोवा येथील गजानन मांद्रेकर यांनी मार्गदर्शन केले. श्रीगणेश उच्च माध्यमिक विद्यालय, गणेशपुरी म्हापसाचे प्राचार्य असलेल्या मांद्रेकर सरांनी परीक्षेच्या दिवसापर्यंतचा अभ्यास, परीक्षेच्या कालावधीतील तयारी आणि मुख्य परीक्षेवेळी हाॅलमध्ये घ्यायची काळजी असे त्रिस्तरीय टप्प्यात मार्गदर्शन केले. हे व्याख्यान आजगाव हायस्कूल माजी विद्यार्थी संघामार्फत आयोजित केले होते.
सुरूवातीला प्रशालेचे मुख्याध्यापक उत्तम भागीत यांनी स्वागत केले, तर संघाचे समन्वयक विनय सौदागर यानी मांद्रेकर सरांचा परिचय करून दिला. सुमारे दोन तास चाललेल्या या मार्गदर्शनात दहावीच्या तीस विद्यार्थ्यांसोबत संवाद साधला गेला. प्रश्नोत्तरातून विषय उलगडत गेला. मुलांनीही विशेष रुची दाखवली आणि राहिलेल्या मोजक्या दिवसांचे नियोजन करणेचे समजून घेतले. शेवटी प्रशालेच्या शिक्षिका मानसी परुळेकर यांनी आभार मानले.
यावेळी नवीन स्थापना झालेला आजगाव हायस्कूल माजी विद्यार्थी संघ यापुढेही अनेक उपक्रम राबविल आणि शाळेला सहाय्यभूत ठरेल,असे सौदागर म्हणाले; तर ‘संघाला आवश्यक ते सहकार्य कायम राहील’ असे मुख्याध्यापक भागीत सरानी सांगितले.