जलरथाद्वारे होणार योजनांची प्रचार प्रसिद्धी

देवगड, दि. ५ मार्च

शासनाच्या विविध योजनांचा प्रचार व प्रसार होऊन त्यात लोकसहभाग वाढवण्याच्या उद्देशाने बनविण्यात आलेल्या जलरथाने टेंबवली गावाला भेट दिली यावेळी टेंबवली सरपंच हेमंत राणे , टेंबवली ग्रामसेवक हनुमंत तेर्से, ग्रामपंचायत कर्मचारी संतोष राणे , सागर घाडी , जितेंद्र जाधव , वानिवडे ग्रामसेविका मनिषा मांडे , पाणी व स्वच्छता समन्वयक विनायक धुरी,पप्पु पारकर व ग्रामस्थ उपस्थित होते .
शासनाच्या जल युक्त शिवार , गाळमुत्क धरणगाळ युक्त शिवार या राज्य शासनाच्या तसेच प्रधानमंत्री कृषि सिंचाई योजना व अटल भुजल योजना या केंद्र शासनाच्या योजना शासनाने गावस्तरावर राबविण्याचा निर्णय घेतला असुन या योजनेत गावांनी सहभाग वाढवावा असे आवाहन गटविकास अधिकारी देवगड वृक्षाली यादव यांनी केले आहे .
शासनाच्या या योजना गावस्तरावर पोहचवण्यासाठी शासनाच्या वतीने कौटिल्य मल्टिक्रिएशन यांच्या सोबत झालेल्या करारानुसार या योजना जलरथाच्या माध्यमातुन प्रचार प्रसार करण्यात येणार आहे . हा जलरथ गावस्तरावर जाणार असुन या योजनांचे महत्त्व पटवुन देण्यासाठी देवगड तालुक्यात तालुका समन्वयक मयुर खंदारे नेमण्यात आला आहे .