देवगड, दि. ५ मार्च
टेंबवली नुतन ग्रामपंचायत इमारतीचे उदघाटन आमदार नितेश राणे यांच्या हस्ते दिपप्रज्वलन व नामफलकाचे अनावरण करून मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आले .
यावेळी गटविकास अधिकारी श्रीम .वृक्षाली यादव , पंचायत समिती देवगडचे माजी सभापती सदाशिव ओगले , भाजप देवगड तालुका अध्यक्ष संतोष किंजवडेकर , भाजप जिल्हा सरचिटणीस संदीप साटम , सहाय्यक गटविकास अधिकारी निलेश जगताप , विस्तार अधिकारी (ग्रामपंचायत ) अंकुश जंगले , ट्रस्टचे माजी अध्यक्ष सुभाष मयेकर ,टेंबवली सरपंच हेमंत राणे, उपसरपंच स्नेहल घाडी ,ग्रामसेवक हनुमंत तेर्से , वरेरी सरपंच गोलतकर , तळवडे सरपंच गोपाळ रूमडे , चाफेड सरपंच किरण मेस्त्री ,टेंबवली माजी सरपंच प्रियांका राणे ,टेंबवली ग्रामपंचायत सदस्य शशिकांत जाधव , स्वाती धुरी , सुधा चेंदवणकर , संजना राणे व वरेरी पोलीस पाटील मुकेश पारकर व मोठया संख्येने टेंबवली कालवी ग्रामस्थ उपस्थित होते .
याप्रसंगी आमदार नितेश राणे म्हणाले कि लोकप्रतिनिधी किंवा अधिकारी हे निमित्त असतात मात्र खरी मेहनत असते ती पाठपुरावा करणाऱ्या कार्यकत्याची असते . आपल्या गावाच्या विकासासाठी आमदारांकडून निधी आणून गावाचा विकास करण हे पण फार मोठ कौशल्य असत हा पाठपुरावा केल्यानेच ६४ वर्षानंतर वास्तु निर्माण होते याच श्रेय या ठिकाणच्या सरपंच व ग्रामपंचायत टीमला जाते . यावेळी आमदार म्हणाले कि या गावाशी आपले भावनिक नाते आहे त्यामुळेच गावच्या विकासासाठी भरघोस निधी दिला जाईल अशी ग्वाही देत आपण केव्हाही हक्काने हाक मारा आपण तत्पर असल्याचा टेंबवलीवासीयांना आवर्जून सांगितले.
यावेळी गटविकास अधिकारी वृक्षाली यादव म्हणाल्या कि गावातील महत्त्वाच कार्यालय हे ग्रामपंचायत असुन या नुतन ग्रामपंचायतीत सरपंच ग्रामसेवक यांच्या माध्यमातुन गावांचा विकास होण्यासाठी योजना शेवटच्या घटकापर्यत पोहचवुन गावाचा सर्वांगीन विकास होईल अशी आशा व्यक्त केली .
यावेळी माजी सभापती सदाशिव ओगले , भाजप जिल्हासरचिटणीस संदीप साटम, सुभाष मयेकर यांनी मनोगत व्यक्त करत नुतन इमारतीस शुभेच्छा दिल्या .
यानंतर टेंबवली सरपंच हेमंत राणे यांनी आमदार नितेश राणे व ग्रामसेवक हनुमंत तेर्से व ग्रामपंचायत होण्यासाठी सहकार्य करणाऱ्या सर्वांचे आभार मानले .
या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन सागर घाडी याने केले .