स्नॅक सेंटर व आकांक्षी शौचालयाचे उद्घाटन

 वेंगुर्ला,दि.५ मार्च

शालेय शिक्षण आणि मराठी भाषा मंत्री तथा सिंधुरत्न समृद्धी योजनेचे अध्यक्ष दिपक केसरकर यांच्या हस्ते कॅम्प-घोडेबांव उद्यान येथील स्नॅक सेंटर व बंदर येथील आकांक्षी शौचालयचे उद्घाटन करण्यात आले.

शहरातील महिलांनी स्वयंपूर्ण होण्यासाठी तसेच त्यांची आर्थिक उन्नत्ती होऊन महिला सक्षमिकरणासाठी हे स्नॅक सेंटर स्थानिक बचत गटांना नाममात्र शुल्क आकारून चालविण्यास देण्यात येणार आहे. बंदरावर येणा-या पर्यटकांसाठी आणि मासे विक्री करणा-या महिला व पुरूषांसाठी स्वच्छ व अत्याधुनिक सुविधांनी परिपूर्ण अशा शौचालयाची उभारणी करण्यात आली आहे. महिला व पुरुष नागरीकांसाठी वेगवेगळे केबीन ठेवण्यात आले आहेत. प्रत्येकी ४ सीट, दिव्यांगांसाठी रॅम्पची सोय, अस्वच्छता तपासण्यासाठी सेन्सर्स आदी सुविधा या शौचालयामध्ये आहेत. शौचालयाच्या निम्म्या भागामध्ये कॉफी शॉप तसेच स्नॅक सेंटर चालविण्यात येणार असून यामधून प्राप्त होणा-या उत्पन्नातून या शौचालयाची देखभाल दुरुस्ती करण्यात येणार आहे. दोन्ही ठिकाणच्या उद्घाटनप्रसंगी मुख्याधिकारी परितोष कंकाळ, तहसिलदार ओंकार ओतारी, सचिन वालावलकर, नितीन मांजरेकर, सुनिल डुबळे, बचत गटांच्या महिला, नगरपरिषदेचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.