विद्यार्थ्यांना बँकपास बुकचे वितरण

 वेंगुर्ला,दि.५ मार्च

‘हाताला काम श्रमाला दाम‘ हे ब्रीद घेऊन कोझ टू कनेक्ट फाऊंडेशन आणि दाभोली इंग्लिश स्कूल माजी विद्यार्थी यांच्या सहकार्याने दाभोली इंग्लिश स्कूलमध्ये तंत्र शिक्षण सुरू करण्यात आले आहे. याद्वारे घेण्यात येणा-या उत्पादनांची विक्री विद्यार्थी करीत आहेत. यातून मिळणारा नफा हा विद्यार्थ्यांच्या सारस्वत बँकमधील खात्यात जमा केला जात आहे. दरम्यान, शाळा बचत उपक्रमांतर्गत सारस्वत बँकेतर्फे विद्यार्थ्यांना बँक पासबूकचे वितरण करण्यात आले. यावेळी मुख्याध्यापक किशोर सोन्सुरकर, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष सुधीर गोलतकर, पालक शिक्षक संघ उपाध्यक्ष आत्माराम प्रभूखानोलकर, शिक्षक वसंत पवार, दिपक पाटील, नितीन घोगळे, रेश्मा चोडणकर यांच्यासह सारस्वत बँक कर्मचारी उपस्थित होते.