सावंतवाडी,दि.१४ जानेवारी
सावंतवाडी नगरपरिषद चे माजी नगरसेवक व सावंतवाडीतील पत्रकार यांच्यात हलक्या चेंडूचा मैत्रीपूर्ण क्रिकेट सामना येथील जिमखाना मैदानावर उद्घाटन उद्योजक विशाल परब, जेष्ठ पत्रकार वसंत उर्फ अण्णा केसरकर व माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर यांच्या उपस्थितीत झाले.
यावेळी शालेय शिक्षण व मराठी भाषा मंत्री दिपक केसरकर यांनी भेट देऊन शुभेच्छा दिल्या.यावेळी पत्रकार, माजी नगरसेवक व नगरपरिषद कर्मचारी उपस्थित होते