सागरेश्वर मंदिरात विविध कार्यक्रम

 वेंगुर्ला,दि.५ मार्च

उभादांडा येथील सागरेश्वर मंदिरात महाशिवरात्री निमित्त ७ मार्च रोजी सकाळी धार्मिक कार्यक्रम, तर ८ मार्च रोजी शिवरात्री दिवशी विधीपूर्वक शिवपिडीचे पूजन, वरदशंकर पूजा, होमहवन, महाआरती, तीर्थप्रसाद, सायं. ४ वा. वारकरी भजने, त्यानंतर पार्सेकर दशावतार मंडळाचे नाटक होणार आहे. भाविकांनी उपस्थित रहावे असे आवाहन करण्यात आले आहे.