शेठ म. ग. हायस्कूलच्या विद्यार्थ्यांना किल्ले बनविणे स्पर्धेतील विजेत्यांना सन्मान चिन्ह व मानपत्र देऊन मान्यवरांच्या हस्ते गौरव

देवगड,दि.५ मार्च
देवगड येथील शेठ मफतलाल गगलभाई हायस्कूलच्या वर्धापन दिनाचे औचित्य साधून देवगड तालुका मराठा समाजाच्या वतीने नुकत्याच हायस्कुल मध्ये पार पडलेल्या किल्ले बनविणे स्पर्धेतील विजेत्यांना सन्मान चिन्ह व मानपत्र देऊन मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आले.
छत्रपती शिवरायांचा इतिहास त्यांचे गड किल्ले यांची माहिती आजच्या युवा पिढीला शालेय विद्यार्थ्यांना व्हावी या अनुषंगाने शेठ म.ग. हायस्कूलमध्ये किल्ले बनविणे स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेतील प्रथम पाच क्रमांकाचे गटांना तसेच उत्तेजनाचे तीन गटांना सन्मानचिन्ह व मानपत्र देऊन गौरविण्यात आले यावेळी मराठा समाजाचे सह खजिनदार किसन सूर्यवंशी, सदस्य शशांक साटम व अन्य मान्यवर उपस्थित होते या या विजेत्या गटांमध्ये पुढील स्पर्धकांचा सहभाग होता. प्रथम क्रमांक इयत्ता नववी ड-सहभागी विद्यार्थी लावण्या प्रवीण हिरलेकर सारा जावेद खान ,मेहेक अब्दुल्लाह खान द्वितीय क्रमांक इयत्ता नववी ड -सुयश हिरनाईक, ओम कांगुटकर रिग्वेद निकम, प्रवीण कोळेकर, आदित्य महाडिक, मंथन पाटील, निनाद सावंत, चिन्मय जाधव, वेदांत बैलकर, तृतीय क्रमांक इयत्ता आठवी क सहभाग विद्यार्थी धैर्या सावंत अनुष्का वाडेकर, इकरा शेख मृदुला सावंत अंतरा कांबळे मुंतशा खान चतुर्थ क्रमांक इयत्ता आठवी क सहभाग विद्यार्थी चैतन्य कोयंडे हर्ष गावकर आर्यन नलावडे गितेश देवरुखकर, साई घाडी हर्ष भोवर, पाचवा क्रमांक इयत्ता नववी ड -आर्या कणेरकर वेदिका कणेरकर, मनस्वी सूर्यवंशी श्रुती कणेरकर उत्तेजनार्थ गट नववी ड -अनुष्का पोकळे अनुश्री श्रीकृष्ण अनभवणे, केतकी
बोंडाळे द्वितीय इयत्ता नववी ड -मानस भाबल विराज बांदकर यश हिरनाईक राज शेडगे लक्ष करंगुटकर अथर्व राऊत आयान शेख उत्तेजनाच्या तृतीय ,इयत्ता नववी -ड संचिता पंडित अनुष्का सावंत, कृतिका टोणपे ,तनिष्का कांबळे ,श्रुती सारंग यांचा समावेश होता सर्व विजेत्यांना मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आले.
या प्रशालेच्या वर्धापन दिनाचे औचित्य साधून शेठ म ग हायस्कुल १९९४-९५ माजी विद्यार्थी इ .दहावी बॅच च्या वतीने जिलेबी वाटप करण्यात आले.
यावेळी माजी विद्यार्थी अनिल कोरगावकर, वसीम शहा, किसन सूर्यवंशी ,मिलिंद मोहिते, निलेश कणेरकर ,तेजस्विता निमणकर ,दिपाली खवळे, प्रीती सारंग उपस्थित होते.या प्रशालेला आयएसओ मानांकन प्राप्त झाल्याबद्दल प्रशालेलेचे संस्थापदाधिकारी,मुख्याध्यापक व शिक्षक वर्ग ययांचे माजी विद्यार्थी वर्गाच्या वतीने अभिनंदन करण्यात आले .