मालवण,दि.५ मार्च
मालवण धुरीवाडा येथील रहिवासी आणि वृत्तपत्र विक्रेते अरविंद उर्फ अरु विठ्ठल धुरी (५९) यांचे सोमवारी रात्री ८ वाजण्याच्या सुमारास अल्पशा आजाराने कोल्हापूर येथील खासगी रुग्णालयात उपचारादरम्यान निधन झाले.
मालवण शहरातील खांडाळेकर न्यूज पेपर एजन्सीच्या माध्यमातून गेली ३५ वर्षे अरविंद धुरी हे मालवणात सायकलद्वारे फिरून वृत्तपत्र विक्री करत होते. हसतमुख आणि मनमिळावू स्वभावामुळे त्यांचा लोकसंग्रह मोठा होता. महिनाभरापूर्वी त्यांची प्रकृती बिघडल्याने त्यांनी वृत्तपत्र विक्रीचे काम बंद केले होते. त्यांना हृदयविकाराच्या धक्क्यामुळे कोल्हापूर येथील खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. मात्र, उपचारादरम्यान काल रात्री त्यांचे निधन झाले. आज मंगळवारी सकाळी चिवला बीच येथील कासवकर स्मशानभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुली, भाऊ, भावजय असा परीवार आहे. रिक्षा व्यावसायिक शरद धुरी आणि धुरीवाडा येथील पिठ गिरण व्यावसायिक सुनिल धुरी यांचे ते बंधु होत.