तळेरे,दि.५ मार्च
तळेरे अंगणवाडी सेविका मीनाक्षी जगन्नाथ मांगले यांचा सेवापुर्ती सत्कार नुकताच करण्यात आला. यानिमित्त विविध संघटना, पदाधिकारी, तळेरे प्राथमिक शाळा, माजी विद्यार्थी यांनी विशेष सत्कार केला.
1989 पासून त्या बालवाडी तर 1997 पासून अंगणवाडीत अंगणवाडी सेविका म्हणून अखंड 35 वर्षे सेवा केली. त्या विद्यार्थी आणि पालकांमध्ये ‘मांगले बाई’ या नावानेच परिचित आहेत. तळेरे जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचे वार्षिक स्नेहसंमेलन मोठ्या उत्साहात साजरे करण्यात आले. त्यावेळी त्यांचा सत्कार करण्यात आला.
यावेळी तळेरे आदर्श व्यापारी संघटना, बाजारपेठ मित्र मंडळ, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा तळेरे नं. 1, शाळा व्यवस्थापन समिती, माजी सभापती दिलीप तळेकर, तळेरे सरपंच हनुमंत तळेकर, पालक यांच्याकडून शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ व भेटवस्तू देऊन गौरविण्यात आले.
मांगले बाई यांच्या मागणीनुसार तळेरे बाजारपेठ मित्र मंडळाने यानिमित्ताने तळेरे अंगणवाडीला दूरदर्शन संच भेट दिला. यावेळी सर्व ग्रामस्थ, शिक्षक, विविध पदाधिकारी आणि पालक यांनी शुभेच्छा दिल्या.