मराठी भाषा दिनाचे औचित्य साधून शालेय स्तरावर निबंध स्पर्धांचे आयोजन

सावंतवाडी,दि.५ मार्च
कोकण मराठी साहित्य परिषद सावंतवाडी शाखा यांच्या वतीने मराठी भाषा दिनाचे औचित्य साधून शालेय स्तरावर दोन गटात निबंध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे
ही स्पर्धा पत्रकार अमोल टेंबकर यांच्या आई सौ.मंदा टेंबकर यांच्या स्मरणार्थ आयोजित करण्यात आली आहे
यात पहिला गट पाचवी ते सातवी निबंध विषय छत्रपती शिवाजी महाराजांचा मराठी बाणा शब्द मर्यादा 500
तर मोठा गट इयत्ता आठवी ते नववी विषय कवी कुसुमाग्रज यांचे साहित्य आणि कविता शब्दमर्यादा 1000 अशी ठेवण्यात आली आहे
यात प्रथम क्रमांक 350 द्वितीय 250 तृतीय दोनशे रुपये व प्रमाणपत्र देऊन गौरवण्यात येणार आहे तरी आपले निबंध दहा मार्च पर्यंत पाठवावेत अधिक माहितीसाठी संपर्क मळगाव हायस्कूल शिक्षिका प्रज्ञा मातोंडकर व सावंतवाडीत राजू तावडे यांच्याकडे 9422584407संपर्क साधावा असे आवाहन अध्यक्ष अध्यक्ष संतोष सावंत व सचिव प्रतिभा चव्हाण यांनी केले आहे