टोपीवाला हायस्कूलच्या माजी विद्यार्थ्यांचा ११ मे रोजी स्नेहमेळावा

मालवण,दि.५ मार्च

मे महिन्याचा दुसरा शनिवार हा ‘माजी विद्यार्थी दिन’ म्हणून साजरा केला जातो. याचेच औचित्य साधून मालवण येथील टोपीवाला हायस्कुलच्या ‘टोपीवाला माजी विद्यार्थी संघटनेतर्फे ‘माजी विद्यार्थी स्नेहमेळावा’ शनिवारी दि. ११ मे २०२४ रोजी दुपारी ३ते ७ या वेळेत टोपीवाला हायस्कूलच्या प्रांगणात आयोजित करण्यात येणार आहे.

टोपीवाला हायस्कुलच्या माजी विद्यार्थ्यांच्या यापूर्वी मुंबई व पुणे येथील स्नेहमेळाव्यास उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला होता. यावर्षी हा स्नेहमेळावा टोपीवाला हायस्कुलमध्येच होणार आहे. या मेळाव्याची रूपरेषा लवकरच जाहीर करण्यात येणार असून यामध्ये सहभागी होऊ इच्छिणाऱ्या प्रशालेच्या माजी विद्यार्थ्यांनी अधिक माहितीसाठी शेवडे सर ९४२११४५६९९, संजय – ९४२२५९६९८७ यांच्याशी संपर्क साधावा असे आवाहन मालवण टीम- टोपीवाला माजी विद्यार्थी संघटना यांच्यातर्फे करण्यात आले आहे.