महीलांची देवगड पोलीस निरीक्षकांकडे मागणी
देवगड,दि.५ मार्च
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पदाधिकारी आणि ई स्टोअर ईंडीया कडून फसवणूक झालेल्या सुमारे शंभरहुन अधिक महीलांनी देवगड पोलिस स्थानकात भेट देऊन फसवणूकीस कारण असलेल्या एजंटां विरोधात गुन्हा दाखल करुन त्यांवर कठोर कारवाई करण्याची आग्रही भूमिका घेत जो पर्यंत गुन्हा दाखल होत नाही तोवर आम्ही येथून जाणार नाही अशा प्रकारची भुमिका घेतली असता.म.न.सेने या पुर्वी केलेल्या १४ फेब्रुवारी २०२४ च्या तक्रारीची दखल घेऊन सदर प्रकरण आर्थिक गुन्हा शाखेजवळ वर्ग केलेले असुन त्या संदर्भात मी पूर्ण माहीती घेतो.कुणकेश्वर यात्रेनिमित्त पोलिस प्रशासन व्यस्त असल्या कारणाने दि.१२ मार्च २४ पर्यत वेळ द्या.त्या नंतर आपल्या मागणी नुसार संबंधितांवर गुन्हा दाखल करुन योग्य ती कडक कारवाई केली जाईल अशा प्रकारचे आश्वासन देवगडचे पोलिस निरीक्षक अरुण देवकर यांनी उपस्थित पदाधिकाऱ्यांना दिले.पोलिस निरीक्षक यांनी केलेल्या विनंतीला मान देउन हे आंदोलन तुर्तास मागे घेत आहोत.परंतु प्रशासनाकडून सहकार्य न मिळाल्यास महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यपद्धतिने न्याय मिळवून देऊ अशा प्रकारचा इशारा म.न.से.तालुकाध्यक्ष .संतोष मयेकर यांनी इ स्टोअर ईंडीया च्या एजंटाना दिला आहे. आजच्या या आंदोलनाचे नेतृत्व महीला तालुकाध्यक्षा सौ.स्वरा करगुटकर आणि उप तालुकाध्यक्षा सौ.स्वाती सावंत यांनी केले.या प्रसंगी शंभरहुन अधिक महीलांसमवेत म.न.वि.से.उपजिल्हाध्यक्ष .अनिकेत तर्फे, शहराध्यक्ष .सचिन राणे, तळवडे शाखाध्यक्ष .सिद्धार्थ जाधव,.प्रविण मयेकर,बबलु परब,सौ.परी देवळेकर,सौ.संचिता घाडी,सौ.राजश्री लाड,सौ.चैतन्या तारकर,सौ.वृषाली टेंबुलकर,सौ.रोहीणी चव्हाण,सौ.दामिनि गांवकर,सानिका बावकर महीला कार्यकर्त्या उपस्थित होत्या.