तहसीलदार कार्यालयात संमती पत्रावर सह्या देण्याचे कामकाज पाच वाजता बंद करण्यात आल्याने लाभार्थ्यांना पायरीवर बसण्याची भूमिका

सावंतवाडी,दि.५ मार्च

सावंतवाडी तहसीलदार कार्यालयात संमती पत्रावर पाच वाजता बंद करण्यात आल्याने लाभार्थ्यांना पायरीवर बसण्याची भूमिका घ्यावी लागली.
सावंतवाडी तहसीलदार कार्यालयात संमती पत्रावर सह्या देण्याचे कामकाज पाच वाजताच बंद करण्यात येते.आज सायंकाळी सव्वा पाच वाजता काही संमती पत्र लाभार्थ्यांनी आपले सेतू मधील संमती पत्राचे टायपिंगचे काम करून सहीसाठी सावंतवाडी तहसीलदार कार्यालयातील अधिकाऱ्यांकडे गेले असता पाच नंतर आपण सही करणार नाही अशी भूमिका संबंधित महिला अधिकाऱ्याने घेतली.यामुळे खूप दूरवरून आलेल्या सर्वसामान्य लाभार्थ्यापुढे फार मोठा प्रश्न निर्माण झाला.यावेळी लाभार्थ्यांनी तहसीलदार कार्यालयाच्या पायरीवर बसण्याची भूमिका घेतली.तहसीलदार श्रीधर पाटील व नायब तहसीलदार मनोज मुसळे यांना संपर्क करून माहिती देण्यात आली.त्यानंतर तात्काळ तहसीलदार पाटील व नायब तहसीलदार मनोज मुसळे यांनी तोडगा काढत संमती पत्रांवर ज्या लाभार्थ्यांना सह्या देण्यात येत नव्हत्या त्यांना सह्या देण्यात आल्या.कार्यालयीन कामकाज सव्वा सहा वाजता बंद होत असल्याने संमती पत्रावर सह्या करण्याची वेळ सव्वा सहा पर्यंत असावी असे सर्वसामान्य जनतेचे मत आहे.
याबाबत यापूर्वी लेखी तक्रार करण्यात आलेली असून त्यावर अद्याप पर्यंत कोणतीही कार्यवाही करण्यात आलेली नाही.एकीकडे सरकार सर्वसामान्य जनतेची काम जलद गतीने होण्यासाठी सरकार आपल्या दरी व इतर अभिक्रम राबवत असताना शासकीय कार्यालयाच्या कार्यालयातील काहीअधिकाऱ्यांच्या आडमुठे धोरणामुळे सर्वसामान्य जनतेला नाहक त्रास होत आहे. यामुळे शासकीय अधिकारीच शासनाच्या उपक्रमाला हरताळ फासत असल्याचे दिसून येत आहे.